भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव तथा प्राणप्रतिष्ठा सोहळा

भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव तथा प्राणप्रतिष्ठा सोहळा- मुल तालुका प्रतिनिधी. विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल, व्दारे भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव तथा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १० फेब्रुवारी २०२५ , रेल्वे स्टेशन मागे, वार्ड क्रं. १६ मुल विश्वकर्मा मंदिर मुल येथे आयोजन करण्यात आले आहे,या कार्यक्रमाचे सुरुवात साकाळी ९ वाजता कलश यात्रा, तसेच ११ वाजता प्राणप्रतिष्ठा पुजन ,हवन पूर्णा आहुती ,आरती या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, प्रमुख पाहुणे डॉ. चक्रपाणी चोप्पावार, मुकुंद दुबे उपाध्यक्ष केमिस्ट्र ॲड डगिस्ट,अजय गोगुलवार सामाजिक कार्यकर्ता , जीवन कोंतमवार, प्रभाकर भोयर, श्रीनिवास गणमुकुलवार, रत्नाकर बोगुजवार, अशोकराव मेडपल्लीवार, मनोजराव कुमुलै,अनिलराव दागमवार , वसंतराव जिरकुंटवार अध्यक्ष पांचाळ समाज मुल ,उपस्थित राहणार आहेत तसेच रांगोळी स्पर्धा,गायन,नूत्य व भावगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,सर्व विश्वबाम्हण पांचाळ समाज बंधु, भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिव पांचाळ समाज मुल विजय वैरागडवार यांनी केले आहे