“जागृत ग्राहक राजा “संघटना मूल च्या वतीने रथसप्तमी प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला .
भारतीय संस्कृतीतील रथ सप्तमी हा महत्वाचा सण निसर्गातील रथचक्र योग्य पद्धतीने चालावे यासाठी सूर्यदेवांनी रथावर स्वार होऊन या निसर्गाच्या रथाचे सारथ्य करीत एक नवीन प्रवास सुरू केला म्हणून हा दिवस आपण प्रवासी दिवस म्हणून साजरा करतो.
हा दिवस आपल्याकडे उत्सवाच्या रूपातही साजरा केल्या जातो. भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारतात वर्णनीत असलेल्या अर्जुनाच्या रथाचे सारथी म्हणून नेतृत्व केले.योग्य सारथीपण केल्याने सर्व जनांचे प्रवासी जीवन सुखदायी पार पडले.
आजच्या काळात चक्र असलेली प्रवासी साधने जसे की रेल्वेगाडी, बसेस, ऑटो व फोर व्हिलर हि आहेत. ह्या प्रवासी साधनांचा सारथ्य करणारे वाहक, चालक, स्टेशन मास्टर व वाहतूक नियंत्रक यांचा पुढेही प्रवाश्यांना सुखरूप पोहचवावे अश्या शुभेच्छा देऊन केलेल्या कार्याबाबत त्यांचे अभिनंदन करणे आपले कर्तव्य ठरते.
रथसप्तमीचे औचित्य साधून जागो ग्राहक राजा संघटना मूल च्या वतीने सन्मा. दीपक देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रवासी दिन मूल येथे साजरा करण्यात आला.
प्रथम रेल्वे स्टेशन मूल येथे येथील स्टेशन मास्टर श्री, करमरकर साहेब, श्री. पाल, श्री. चौधरी ट्रेन ड्राइवर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर बसस्थानक मूल येथे श्री. सातपुते वाहतूक नियंत्रक, मडावी वाहक, किन्नाके चालक व पंधरे वाहक यांचा सत्कार करून पुढेही प्रवाश्यांचे सारथ्य यशस्वीपणे करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर ऑटो स्टॅन्ड मूल येथे ट्रॅव्हल स्टॅन्ड येथे श्री. विजय चिलके व अजय चिंचोलकर वाहक यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच ऑटो स्टॅन्ड मूल येथे ऑटो मालक -चालक श्री. दिलीप गोटेफोडे, किशोर कमलापूरकर व दत्तात्रय गुज्जनवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री.रमेश डांगरे सचिव, श्री.अशोक मैदमवार उपाध्यक्ष, श्री तुळशीराम बांगरे संघटक, मुक्तेश्वर खोब्रागडे, डॉ. आनंदराव कुळे, डॉ. कपिल वाळके, राजूभाऊ गेडाम , प्रशांत वासाडे व अनेक प्रवासी, वाहक, चालक आणि मान्यवर उपस्थित होते.