मुल येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

मुल येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुल येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्वंसोयीयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, स्वर्गीय विनोद चितालिया यांच्या स्मृती प्रीत्यर्थ श्रीमती भद्रादेवी विनोद चितालिया, विरल विनोद चितालिया, मीलान विनोद चितालिया यांच्या सौजण्यातून सदर रुग्णवाहिका देण्यात आली, चितालिया परिवाराच्या वतीने श्री विरल चितालिया हे स्वतः आज या सोहळ्याला उपस्थित होते, या प्रसंगी अमोल जाधव मुंबई,माजी जीप अध्यक्ष श्रीमती संध्याताई गुरनुले, जलतरण संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष अजय गोगुलवार , मंगेश पोटवार आदी लोक मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय भारत मातेच्या पूजनाने व महाराष्ट्र गीताने झाली , आमदार सुधीर मुनगंटीवार व विरल चितालिया यांनी सर्व मान्यवर, जलतरण संघटनेचे कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थितीत फीत कापून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले, आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले सोबतच संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, प्रसंगी विरल चितालिया यांचे पण मार्गदर्शन झाले,संस्थेचे सचिव किशोर कापगते यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची माहिती देत आमदार मुनगंटीवार व चितालिया यांचे आभार मानले, संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रविनजी मोहूर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, जलतरण संघटनेचे संजय चिंतावार, मनोज रणदिवे, अरुण खोब्रागडे,रामदास उरकुडे,प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले, संजय जीवतोडे, संजय मारकवार, दुर्वास घोंगडे, हितेश निकोडे, नवनाथ शेंडे, प्रशांत मुत्यारपवार, नितीन गेडाम,राजेश सूत्रपवार, चौरसिया, निलेश माहोरे, नवीन गुरणानी, आशिष आगडे, तेजस रणदिवे, क्रिश अंबुरतीवार,सक्षम बोकडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते