मुल तालुक्यातील चिखली येथे विशेष शिबिर –
मुल – धर्मेंद्र सुत्रपवार
सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या अंतर्गत मूल तालुक्यातील चिखली येथे आज दिनांक 28 फरवरी 2025 ला विशेष शिबिरा दरम्यान नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसिलदार मृदुला मोरे, नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, उपसरपंच कडस्कर,माजी सरपंच मंडलवार तसेच मंचावर मंडळ अधिकारी,तसेच तलाठी यांच्यासह आदी उपस्थित होते.
ॲग्रीस्टाक योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीला आधार लिंक करायचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती मिळणार असून सर्व शेतकऱ्यांना आग्रिस्टाक पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा तहसीलदार-मृदुला मोरे
संजय गांधी,श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्या नागरीकांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे संजय गांधी निराधार योजनेतील नायब तहसिलदार ओंकार ठाकरे यांनी सांगीतल.
चिखली येथील नागरीकांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात येतील असे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनावरून बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते यावेळी विविध दाखले, प्रमाणपत्र, रेशनकार्ड इत्यादी वितरीत करण्यात आले.
विशेष शिबिरात संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागाअंतर्गत रेशनकार्ड, अग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी निर्माण करणे तसेच विविध योजना बाबत माहिती देवून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली, तसेच गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ निकाली काढण्यात आले.
100 दिवस विशेष शिबिरात करण्यात आलेले वाटप : 1) सातबारा वाटप 2) नमुना 8 अ वाटप- 3) उत्पन्न दाखला 4) ऍग्री स्टॅक नोंदणी 6) संजय गांधी निराधार अर्ज 7) श्रावण बाळ निराधार अर्ज – तसेच विविध प्रमाणपत्र पत्राचे स्टॉल लावण्यात आलेले होते.कार्यक्रमात ग्रामस्थ,विद्यार्थी,विद्यार्थीनी बहूसंख्येने,सीएससी केंद्र संचालक, ग्रामपंचायत ऑपरेटर उपस्थित होते. .