विभागीय कार्यकारणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्षपदी- आश्विन येलमुले तर सचिव पदी संजय सोमनकर यांची निवड-
आमसभेत नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली .
मुल – धर्मेंद्र सुत्रपवार
आज दिनांक ५/३/२०२५रोजी चंद्रपूर विभागाची वार्षिक सर्वसाधारण आमसभा विश्वकर्मा भवन ,मुल रोड चंद्रपूर येथे असंख्य पदाधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत पार पडली .
आमसभेत संघटनेचे अनेक कर्मचारी यांनी कामगार संघटनेच्या प्रामाणीक नेतृत्वावर विश्वास ठेवून कामगार संघटनेत जाहीर प्रवेश केला .
त्याच प्रमाणे चंद्रपूर विभागाने नेतृत्व तयार करण्याची परंपरा राखत प्रादेशिक सचिव नागपूर प्रदेश तथा माजी विभागीय अध्यक्ष श्री दत्ता भाऊ बावणे यांनी स्वत नवीन नेतृत्व यांचे नाव पुढे करत स्वःताचे नाव मागे घेतले व अशा प्रकारे चंद्रपूर विभागाला नवीन व तरुण असे नेत्तत्व मिळाले
तसेच या आमसभेत दत्ता भाऊ यांच्या निर्णयाला समर्थन देत सभासदांच्या उपस्थितीत एकमताने नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली .
कोषाध्यक्ष- श्री सचिन चल्लावार तर कार्याध्यक्ष म्हणून श्री किशोर धोपटे
या सर्व सभासदांनी नवनिर्वाचीत .पदाधिकारी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली . सर्व सभासदांनी भरभरून
मनःपूर्वक अभिनंदन केले आणी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या .




