ने हि. वि.द्यालयात शालेय गणवेश व बॅग वाटप कार्यक्रम संपन्न.

ने हि. वि.द्यालयात शालेय गणवेश व बॅग वाटप कार्यक्रम
संपन्न.

नागभीड:—
स्व. किसनलाल मदन गोपलजी भैया फॉउंडेशन तर्फे, नेवजाबाई हितकारणी विद्यालय, नवेगाव पांडव येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व बॅग वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. अशोकजी नेवजाबाई हितकारणी शिक्षण संस्थेचे सचिव
अशोकजी भैया हे होते. त्यांनी स्वतः उपस्थित अतिथींसह विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून
गुरूदेव छात्रालयाचे अध्यक्ष विठ्ठलरावजी बोरकुटे, माजी विदयार्थी तथा राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प़ा.महेश पानसे, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी कमलाकरजी पांडव तसेच * मुख्याध्यापक वी. सी. भैय्या यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात *इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना* शालेय गणवेश व बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या समाधानाची साक्ष देत होता.

कार्यक्रमाची सांगता सर्व मान्यवरांचे आभार मानून करण्यात आली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नवघडे मॅडम व आभार
शिक्षक बुल्ले यांनी केले.