गुरूंचे अमूल्य मागॅदशॅन हेच पत्रकारितेतील यशाचे गमक.

गुरूंचे अमूल्य मागॅदशॅन हेच
पत्रकारितेतील यशाचे गमक.
शंकर बोरघरे.

चंद्रपूर :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दै. लोकशाही चे जिल्हा प्रतिनिधी शंकर बोरघरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पत्रकारितेतील गुरू प्रा. महेश पानसे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
शंकर बोरघरे यांनी पत्रकारितेतील चाणक्य महेश पानसे
सर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेतील वाटचाल यावर आठवण कथन केली. त्यांनी सांगितले की, प्रा. महेश पानसे सरांनी त्यांच्या पत्रकारितेच्या सुरुवातीस एक  टि-शर्ट घालून वृत्तपत्राच्या कार्यालयात जायचा व त्याच्या बातम्या प्रकाशित होण्यास बोलायचा. सरांनी तब्बल तिन, चार महिने पयॅंत बातम्या लिहायला लावण व कार्यालयीन प्रतीनीधींना
लावण्यास सांगणे हेच केले. बातम्या लागत नव्हत्या पण सर कायॉलयात
विचारपूस करून सुधारणा सुचवायचे.
या प्रयत्नांमुळे कालांतराने त्यांची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागली. बातम्या परिपक्व होऊ लागल्या. सर नवनवीन विषयांवर
काम करायला सांगायचे, बातम्यांवर संस्कार करुन प्रसिद्ध करायचे.
शंकर बोरघरे यांनी नमूद केले की, मेहनतीचे फळ उशिरा मिळते, पण निश्चितच मिळते. अशा साधारण घरातून आलेल्या एका मुलाला प्रा. पानसे सरांनी त्यांच्या सोबतचा प्रवासात ठेवून शिष्यत्वाचा दर्जा दिला. त्याचा त्यांना अत्यंत अभिमान आहे आणि आनंदही वाटतो. अनेक वर्षे सरांच्या मागॅदशॅनात पत्रकारितेची वाटचाल सुरू आहे हे माझे सौभाग्य.
वाढदिवसाच्या शुभेच्छांवर आभार मत देताना बोरघरे यांनी सांगितले की, “माझे भाग्य आहे की प्रा. महेश पानसे सरांनी मला एका कबाडीतून उचलले आणि राज्य पत्रकार संघात तालुका अध्यक्ष, नंतर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.”
शंकर बोरघरे यांनी प्रा. पानसे सरांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या प्रसंगी पत्रकार संघातील विविध पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते. प्रा. महेश पानसे सर हे राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शंकर बोरघरे यांसारख्या शेकडो नवोदित पत्रकारांनी प्रगती साधली असून ते क्षेत्रात आदर्श ठरले आहेत.
*****************””””
*संपादकीय टिप्पणी:*
*********************
शंकर बोरघरे यांचे हे अनुभव आणि आभार व्यक्त करण्याची शैली महाराष्ट्रातील पत्रकारितेतील गुरु-शिष्य संबंधांचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. त्यांची मेहनत व गुरूंचे मार्गदर्शन याचा साथॅ अभिमान स्पष्ट होतो. वर्तमानपत्रातील वाटचाल व पत्रकार संघातील संघटनात्मक कामगिरी याची छान झलक दिसून येते.