मारोडा ऊश्राळा येथील युवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर याच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश
मुल – प्रतिनिधी
मारोडा ऊश्राळा येथील शेकडो युवक, शेतकरी बंधूनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार याच्या महाराष्ट्र राज्यातील फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित विकासात्मक भूमिकेवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर याच्या मार्गदर्शनातं आणि प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, मुल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव प्रशांत मेश्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अजिंक्य पा. मारकवार याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मारोडा येथील अमोल मानकर,केमदेव वाढई, धनराज वाढई,अतुल कागदेलवार, राहुल नेरलवार, संजय वैरागडे,शालिक गुरुनुले,लखन गुरुनुले,आशिक मोहुर्ले, साईनाथ मांदाळे,प्रमोद मांदाळे,सुधीर वाळके, राजू ठाकरे, प्रकाश गोरडवार, अनिल देऊलवार यांचा समावेश असून ऊश्राळा येथील युवा नेतृत्व संदीप मंडलवार याच्या सोबत ऊश्राळा येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सर्व युवक, मंडळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा टाकून त्याचे पक्षात स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष किसन गुरुनुले, टेकाडीचे सरपंच सतीश पा. चौधरी, वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष आनंदरावं गोहने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील कामडी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.




