थोर व्यक्तींच्या जयंती व स्मृतिदिन यादीतून संत तुकाराम महाराज गायब..
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव समाविष्ट करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा. . . राष्ट्रीयकुणबी महासंघाचे उपविभागीय अधिकारी मूल यांना निवेदन..
मुल – प्रतिनिध
मूल- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२५ ला सन २०२६ वर्षासाठी राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती व संत महात्म्यांची जयंती व स्मृतिदिन साजरी करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर यादीत तब्बल ४५ थोर व्यक्तींचा समावेश करण्यात आला असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा कळस असलेलेआणि जगाला मानवतावादाचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा कुणबी आणि ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली असून ही चूक न सुधारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरिकर यांचे नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांना उपविभागीय अधिकारी मूल यांचे मार्फत दिलेल्या निवेदनातून केला आहे. संत तुकाराम महाराज हे बहुजन समाजाला जागृत करणारे क्रांतिकारक संत होते. त्यांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथा परंपरेवर प्रहार केले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा अपमान करण्यात येत असेल तर संपूर्ण राज्यभर कुणबी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेळण्याचा असा इशारा देखील राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी. के. आरीकर यांचे नेतृत्वात राष्ट्रीय कुणबी महासंघ मूल च्या वतीने निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला. ताबडतोब संत तुकाराम महाराज यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट करावे जर शासनाने आपले धोरण बदलविले नाही तर आगामी काळात राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरून सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा राष्ट्रीय कुणबी महासंघ मूल च्या वतीने दिला आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या निधनानंतरही शासकीय सन्मान मिळण्यासाठी कुणबी ओबीसी समाजाला संघर्ष करावा लागत असेल तर ही गंभीर बाब असून या सरकारच्या निर्णयाचा कुणबी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येतआहे. निवेदन देताना शिष्टमंडळात राष्ट्रीय कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरिकर,संतोष चिताडे, प्रभाकर भोयर, गणेश मांडवकर,प्रा. सुनील शेरकी, जगदीश कडसकर, पंकज लाडवे, वैभव तांगडे,डॉ. अशोक चौधरी, प्रा. वसंतराव ताजने, प्रा. किसन वासाडे, डॉ. आनंदराव कुळे, वैभव तांगडे, सुखदेव चौथाले, देविदास मशाखेत्री, विलास मांडवकर, राजेश ठाकरे, प्रा. गजानन नागपुरे, प्रशांत लाडवे, धनराज शेरकी,गुरूदास गोहणे, किशोर चौखुंडे, किशोर राऊत, शिव शेरकी, प्रा. सौं.रत्नामाला भोयर, सौं.भावना चौखुंडे, सौं. संजीवनी वाघरे, कुमुदिनी भोयर,सौं.आचल चौखुंडे, सौं.विद्या बोबाटे, सौं.कल्पना नरुले,सौं. श्वेता शेरकी, सौं. टीना ठाकरे
आदीसह कुणबी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




