नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .
मुल – प्रतिनिधी
आज दि. 13/0.3/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मार्गदर्शनात राष्ट्रीय हरित सेना टीम व सामाजिक वनीकरण टीम मूल.. विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
शाळेच्या पर्यवेक्षिका तसेच हरित सेना टीम च्या मार्गदर्शिका सौ.व्ही.एस.भांडारकर यांनी सीडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.. तसेच विद्यार्थांनी शालेय परिसरात स्वच्छता केली..
निसर्गाचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच विद्यार्थांनी निसर्ग वाचवण्याचे संदेश दिले.
अशा विविध उपकाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्यात आली…
सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी..जी.बारसागडे शाळेच्या पर्यवेक्षिका तसेच हरित सेना टीम च्या मार्गदर्शिका सौ.व्ही.एस.भांडारकर आर.एफ.ओ.संध्या बगडे सामाजिक वनीकरण टीम,हरित सेनेचे विद्यार्थी इ.उपस्थित होते.. अतिशय आनंददायी वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.




