शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत
महामानवांची जयंती संपन्न.

चंद्रपूर/मूल

विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान महाविद्यालय मूल येथे संपन्न झाली.
नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी
पुष्पहार घालून महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य छत्रपती
बारसागडे, यांनीही पुष्प अर्पन करून अभिवादन केले.
यावेळी प्रा. महेश पानसे,
प्रा. किसन वासाडे,जेष्ट शिक्षक गुरुदास चौधरी, सुपरवायझर  वर्षा भांडारकर, प्रा. पुस्तोडे, , प्रा. विजय काटकर, प्रा. संजय येरोजवार, प्रा. प़भाकर धोटे
शिक्षक सर्व श्री. राजू बोढे,निलेश
माथनकर,उदय चौधरी, श्री. सलाम, श्री.पुप्पलवार, श्री. निखाडे,कु.उमक, कु. तलांडे
तथा नवभारत विद्यालयातील इतर सर्व
शिक्षक,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवभारत कन्या विद्यालयातील
आमदार फंडातून मिळालेल्या वाॅटर
फिल्टर चा अपॅण सोहळा सुद्धा आ.
सुधाकरराव अडबाले यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी यांचेसह नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित
होते.
यावेळी आ. सुधाकरराव अड बाले यांनी महामानवांची शिकवण अंगीकारण्याचा व महामानवांनी दिलेल्या सविंधानाचा
आदर करण्याचा मौलिक सल्ला दिला.

आमदारांनी उपस्थिती दाखवून
दिलेल्या मौलिक उपदेशाबद्धल नवभारत कनिष्ठ विज्ञान महा. चे
प्राचार्य छत्रपती बारसागडे यांनी आभार मानले.