मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल;—- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून न. प. प्रशाशनाने
कार्यकुशलता दाखवून दिली. आता
नगराध्यक्षा सौ. ऐकता समर्थ,बांधकाम सभापती प्रशांत समर्थ व मुख्याधिकारी संदीप थोडे
यांनी मान्सूनपूर्व नियोजनाकरीता प्रभागवार आराखडा उभा करण्याचा सुभारंभ केला आहे.
दि. 4 जून ला स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी वार्ड १ व २ मध्ये
मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा घेतला व मान्सूनपूर्व नियोजनाची सुरवात केली.
यापुढे दररोज प्रत्येक वार्डात
स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधित नगरसेवक उपस्थित होऊन
आढावा घेतील, लोकांनी संवाद साधतील व लगेच अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देऊन कामाला लावणार असल्याने मान्सून काळात जनतेला विशेष
गैरसोयीचा सामना करावा लागणार
नसल्याने शहरात आनंद व्यक्त होत आहे.

********************””******
गत ४ वर्षआधी मान्सूनपूर्व नियोजना अभावी संपुर्ण शहरात
पूरस्थिती तयार झाली होती. शहरातील 800 घरांमध्ये पाणी
घुसून मोठी नासधूस व मानहानी
झाली होती.
शहराबाहेरील पावसाचा मोठा लोंढा
शहरात घुसल्याने व निचरा होण्याचे
नियोजन नसल्याने गोंधळ माजला होता. गत तिन वर्षा पासून यावर
न. प. तफै उपाय योजना करण्यात आली परंतू ही उपाय योजना स्थाई
नसल्याने भविष्यात जिवघेणे संकट
उभे ठाकू शकेल याची जाणीव
न. प. प्रशाशनास असल्याने यावर दिर्घकालीन उपाय योजनेची जनतेची अपेक्षा राहणार आहे.
***************************