श्री. विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
देसाईगंज :-
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर रोजी झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याने सन 1962 पासून त्यांचे जन्मदिनी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो.
त्यानुसार आज 5 सप्टेंबर रोजी स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात नगर परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सन्मानपत्र देउुन मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या शाळांतून मागील वर्षी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम क्रमाक न.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा वडसा जूनी ,द्वितीय क्रमांक .न.प.मराठी प्राथमिक शाळा भगत सिंग वार्ड तर तृतिय क्रमांक न.प.मराठी प्राथमिक शाळा विर्शी वार्ड चे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना विषेश पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र मातेरे, तर प्रमुख मार्गदर्शक नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा,केंद्र प्रमुख अंबाजी आमनर हे प्रामुख्याने उपस्थित होते .
या कार्यक्रमांचे संचालन किशोर चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन शिवराम हाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नगर परिषद शाळेतील मुख्याध्यापक ,कल्पना पत्रे ,किशोर चव्हाण, शिवराम हाके, आशा नाकाडे, संध्या लांजेवार , मंगला सहारे, बाळकृष्ण मेश्राम,शबाना सिद्दीकी तसेच सहाय्यक शिक्षक/शिक्षीका वंदना उसेंडी, शोभा साखरे,मीना कुमोटी,मोहन गहाणे,मिनाक्षी शालिग्राम, वाल्मीक कापगते,अंताराम कापगते,राजू तिघरे,ईश्वर गहाणे,राहूल मस्के ,राजेश मडावी,देवला पेंद्राम,रामेश्वर मेंढे, मुजाहिद पठाण,तस्लीम खान,मजहरबानो व शाळेतील कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.