श्री. विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
शिक्षक हा राष्ट्र निर्माता – डॉ. शंकर कुकरेजा
देसाईगंज: “भविष्यातले डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, लेखक व विचारवंत निर्माण करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षकांमुळेच विद्यार्थी विचार करू लागतात शिक्षण घेऊ लागतात आणि मोठ्या पदावर पोहचतात. संस्कार, शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन राष्ट्र उभारणीत शिक्षकच महत्वाची भूमिका पार पाडतात.” असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी केले. ते शिक्षक दिन व सामाजिक पंधरवडा समारोप प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक व रासेयो विभागाच्या वतीने आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना भेट वस्तू देऊन याप्रसंगी सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जयदेव देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन कु. पुनम राऊत हिने तर उपस्थितांचे आभार प्रांजली ढोरे हिने मानले.