प्रेस नोट
सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट द्वारा आयोजित बैठक संविधान सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या जटपुरा गेट जवळील कार्यालयात सकाळी 8 ते 10 दरम्यान संपन्न झाली. सामूहिक राष्ट्रागीता ने सुरु झालेल्या संविधान शाखेत गोंडवाना विद्यापीठाच्या नुकत्याच संपन्न सिनेट निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यात आली. व संविधान शाखेमध्ये निवडणुकी पूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सेक्युलर पॅनल च्या उमेदवारांनी काही मते घेतल्याने शिक्षक आघाडी व सेक्युलर उमेदवारा मध्ये झालेल्या मत विभाजनाचा फायदा RSS प्रणित शिक्षण मंच ला काही प्रमाणात झाल्याचे दिसून आले. पदवीधर मतदार संघातून शिक्षण मंच चे पाच, शिक्षक आघाडीचे चार व सेक्युलर चे एक उमेदवार निवडून आले. सर्व विजयी उमेदवारांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मध्ये बहुजन समाजाच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जाईल यावर भर द्यावा अशी अपेक्षा वक्त केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दि 7 सप्टेंबर 22 ला कन्याकुमारी पासून सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचे कव्हरेज प्रसार माध्यमे करीत नसल्या बद्धल चिंता व्यक्त करून सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करून संघ प्रणित हुकूमशाहीवादी मोदी बीजेपी सरकार च्या लोकशाही विरोधी दुषकृत्यांचा परदाफाश राहुल गांधी करीत असल्या बद्धल समाधान व्यक्त करीत, मोदी सरकार च्या देशहीत व जनहीत विरोधी धोरना विरोधात लोकांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्धल भारत जोडो यात्रेचे सर्वांनी स्वागत करावे असे आवाहन करण्यात आले.
पावसा मुळे बंदिस्त कार्यालयात होणाऱ्या संविधान शाखा पाऊस जाताच लवकरच खुल्या पटांगणात घेण्यात येईल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली.
शेवटी भारतीय संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन व राष्ट्रवंदनेचे सामूहिक गायन करण्यात आले आणि प्रत्येकाने स्व परिचय देऊन संविधान शाखेचे विसर्जन करण्यात आले.



