जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली उसेंडी परिवाराची सांत्वन भेट

श्री.अनिल गुरनुले,अहेरी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

अहेरी :- ग्रामपंचायत देवदा अतंर्गत येत असलेल्या मोरखंडी येथील सरपंच केशरी पाटील उसेंडी यांचे वडिलांचे काल दुःखद निधन झाले. याबाबत माहिती होताच जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जतन कार्यक्रमाला उपस्थित राहून शोक व्यक्त करत आदरांजली वाहत उसेंडी परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी नंदूभाऊ मट्ठामी तालुका अध्यक्ष आविस/ग्रामसभा, प्रज्वल नागुलवार सचिव आविस/ग्रामसभा, मंगेश हलामी माजी सदस्य पं.स एटापल्ली, रमेश वैरागड़े सदस्य तथा संचालक बाजार समिति अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी तसेच आ.वि.स.कार्यकर्ते व गावातील नागरीक उपस्थित होते..!!