मार्कंडा देव येथे वृक्षारोपण व वृक्ष दिंडी कार्यक्रमाचे आयोजन

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

धार्मिक स्थळी रुद्राक्ष व बेल वृक्षाचे अन्यंय साधारण महत्व लक्षात घेऊन राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून अमोल आईंचवार मित्रपरिवारा कडून मार्कंडा देव येथे रुद्राक्ष व बेल या वृक्षांचे वृक्षारोपण व वृक्ष दिंडीचां कार्यक्रम o७ आक्टोंबर रोजी श्री रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेत घेण्यात आला

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्कडा सरपंच उज्ज्वला गायकवाड , श्री रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, सचिव अशोक तिवारी, सहसचिव केशवराव आंबटवार, गोपाल महाराज रणदिवे , कवडूजीआईंचवार ,चंद्रपूर येथील राजेश सुरावर, शैलेंद्रसिह बैस, जयंत बोंनगीरवार, महेश कल्लुरवार, राजेश्र्वर चिंतावार, दिलीप नेरलवार, गिरिधर उपगनलावार, अमित कासमगोटूवार, प्राचार्य डॉ हिराजी बंपुरकर,न.प. च्या महीला बाल कल्याण सभापती प्रेमा आईंचवार, जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, अविनाश तालापल्लीवार, सोमा गुडघे, दिलीप कुंघाडकर, , महेश काबरा, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप चलाख, नंदूरणदिवे, विनोद पेशत्तीवार, बबन वडेट्टीवार चामिर्शी वनविभागाचे कर्मचारीआदीउपस्थितहोते कार्यक्रमा दरम्यान मर्कांडा येथील श्री रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेत चाकलपेठ येथील गुरुदेव सेवा मंडळाचा भजन कार्यक्रमासह वृक्ष दिंडी गावातील प्रमुख मार्गाने नेण्यात आली त्यानंतर धर्मशाळेच्या पदाधिकाऱ्यांनीजागाउपलब्धकरून दिलेल्या जागेवर.रुद्राक्ष व बेल या झाडाचे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अमोल आईंचवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.