जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर, गडचिरोली
गावोगावी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे ठराव घेणार
गडचिरोली – ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात, वाडी वस्तीतील मुले शिक्षानाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाऊ नयेत या साठी आपल्या गावातील शाळा वाच्याव्यात म्हणून शिक्षक भारतीने राज्यात पुढाकार घेतली आहे प्रशासकीय स्तरावर 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत या विरोधात शिक्षक भारतीने शाळाव्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत चे ठरावं घेण्याची मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती शिक्षक भारती गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख यांनी दिली आहे.
या मोहिमेत विध्यार्थी, पालक, समविचारी संघटना, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सहभागी होणार आहेत. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड तथा राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली जाणार आहे.
शाळेच्या परिसरात विध्यार्थी, पालक, गावातील नागरिक समविचारी व्यक्ती एकत्र येऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिक्षण वाचवा शाळा वाचवा अभियान राबविले जाईल. शाळा व्यवस्थान समिती आणि ग्रामपंचायत यांचे वतीने दोन स्वतंत्र ठरावं करण्यात येतील. ग्रामस्तरावर आलेले ठराव एकत्रित करून ते जिल्हाधिकारी यांना देण्यात येतील शाळा बंद करण्यात येऊ नये या मोहिमेत सर्व पालक, समविचारी संघटना यांनी सहभागी होण्याचे आवाहन गाडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, संजय मेश्राम नागपूर विभागीय उपाध्यक्ष, आर एस बिट्टीवार, अमरदीप भुरले, यमाजी मुजमकर, रवींद्र गावंडे, तुळशीदास ठालाल, गुरुदेव सोमनकर, रघुपती मुरमाडे, खुशाल भुरसे, मारोती देवतळे, हिराशिंग बोगा, श्रीकांत राऊत, बालाजी रेशे, संतोष मेंदाळे , प्रकाश उईके, प्रेमादास लोणारे, हेमंत दुर्गे, अंताराम पदा, नीलकंठ तागडे, रवींद्र गवारे, तिरुपती मुरमाडीगेला, रमेश कडेकरी, सरांजामी जोडे, भगवान मडावी, कु. आशा दाकोटे कु. अरुणा कुळमेथे, रमेश भोयर, वसंत मडावी आदिनी केले आहे.