युवकांनी पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करावे. –आमदार विजय वडेट्टीवार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

महर्षी वाल्मिकी हे आद्यकवी आहेत. त्यांच्या जिवनप्रवासातुन बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातून आपल्या समाजातील नागरिकांनी बोध घेत आपलं जीवन सुध्दा कसं समृध्द व आनंदी बनवता येईल यासाठी प्रयत्न करावे. सोबतच समाजातील युवकांनी पुढे येऊन स्वतःचा व समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा. तसेच युवकांनी नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपुरी शहरात महर्षी वाल्मीक जयंती उत्सव समिती द्वारे आयोजित सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, एकलव्य सेनेचे संस्थापक प्रा. के. नान्हे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेविका वनिताताई अलगदेवे, नगरसेविका सरीता पारधी, नगरसेविका सुनीता तिडके, नगरसेविका लता ठाकुर, पत्रकार राहुल मैंद यांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलतांना आ. वडेट्टीवार म्हणाले की, भोई समाजातील मुले शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असुन आपल्या मुलांनाही अचुक इंग्रजी बोलता आली पाहिजे. भोई समाजाला सभागृह बांधकाम करण्यासाठी येत्या काळात आपण २५ लाख रुपयांचा निधी सुध्दा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटराव चाचरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समीतीचे प्रमुख यशवंत दिघोरे, अमोल भानारकर, स्वप्नील अलगदेवे, डॉ. प्रशांत मेश्राम यांसह समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.