श्री.अनिल गुरनुले, अहेरी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
तलाठी व गावातील कोतवाल यांच्या माध्यमाणे शेतीचे सर्वे ई. पीक वर्जन २ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल द्वारे ई. पिक सर्वे केला आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या कडून धान खरेदी करिता शेतक-यांकडुन सातबारा १५/१०/२०२२ पर्यंत आले असल्यामुळे शेतकरी तलाठी कार्यालयात बेलगुर येथे जाऊन सातबारा ची मागणी केली असता सदर तलाठी यानी साईटवर शेतक-यांनी ई. पिक पाहणी वर्जन २ नुसार अपलोड झालेले नसल्याचे सांगितले म्हणून चालू सत्रातील ई. पिक वर्जन २ सर्वे झालेला सातबारा देता येत नाही असे सुद्धा सांगितले , पण शेतकऱ्यांना धान विक्री करता करिता ई. पिक सर्वे झालेल्या सातबारा ची गरज आहे . आणि शेतकरी जेव्हा स्वतःच्या मोबाईलद्वारे ई. पिक सर्वे करतात तर मात्र शेतक-याच्या मोबाइल मध्ये दिसून येत आहेत . पण शासकीय साईट वर मात्र ते दिसून येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले, यामुळे शेतकर्त्यांनी मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय अहेरी यांना आपले निवेदन देतांना त्यांनी मागणी केली आहे कि अडचण लक्षात घेऊन ई -पीक झालेले सातबारे लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे
सदर निवेदन मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय अहेरी यांना श्री. उमेश मोहुर्ले , उपसरपंच वेलगूर, साईनाथ नागोसे , विश्वनाथजी गुरनुले गंगाधर लोनबले , प्रवीण रेपे , श्यामराव गुरनुले , आणि परशुराम गुरनुले यांनी दिले आहे .