आरमोरी तहसील कार्यालयावर बहुजन समाज पार्टी चा विशाल मोर्चा

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

बसपाचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर साहब कांशीराम जी यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा द्वारा आरमोरी तहसील कार्यालयावर विशाल जन आंदोलन दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ला आयोजित केला होता. प्रदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात वैरागड ते आरमोरी रॅली काढून आरमोरी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करून रॅली काढत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी महापुरुषांच्या जयघोषात व विविध नाऱ्याच्या जयघोषात संपूर्ण आरमोरी नगरी दुमदुमली. व विविध मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती मा. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

आमदार खासदारांचे पेन्शन बंद झालेच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे , ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, शिक्षण नोकरी राजकारणात 52 टक्के आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, बहुजनावर होत असलेला अन्याय अत्याचार थांबलाच पाहिजे, वृद्धांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळालाच पाहिजे,  आदिवासींना शासन निर्णयाप्रमाणे जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे, खाजगीकरण बंद करून सुशिक्षित बेरोजगारांना त्वरित नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे,  , शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्ण लागू झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसह निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी निवेदन सादर करताना बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एडवोकेट सुनील डोंगरे साहेब, नागपूर झोन प्रभारी विजयकुमार डहाट, डी.एस रामटेके महाराष्ट्र प्रदेश सचिव, धारणे सर, इंजी. गोपालजी खांबालकर बामसेफ , जिल्हा प्रभारी प्रदीप खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, जिल्हा प्रभारी गणपत तावडे ,जिल्हा सचिव भूजंगराव पात्रीकर, आरमोरी विधानसभा अध्यक्ष कृपानंद सोनटक्के, कोषाध्यक्ष जयद्रथ बोदेले ,विधानसभा सचिव अश्विन बोदेले, तुफान कोठांगले बीवीएफ संयोजक ,सुधीर बोदेले बसपा पदाधिकारी ,सिद्धार्थ घुटके, मनोज खोब्रागडे जेष्ठ कार्यकर्ते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांता कांबळे, अरुणा खोब्रागडे ,व महिला आघाडीच्या अन्य महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या .