श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन
ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यातील रनमोचन येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचनच्या वतीने भव्य विदर्भस्थरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण २९ महिला व पुरुष भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. *या भव्य विदर्भस्थरीय खंजरी भजन स्पर्धेचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सहउद्घाटक म्हणून गडचिरोली येथील माजी आमदार नामदेवराव उसेंडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके तर प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच संघटना अध्यक्ष सोनुभाऊ नाकतोडे, गडचिरोली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख चंदू उर्फ अमित बेहरे, ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर ,सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष सुरेश दर्वे,भूषण सातव, शैलेश चीतमलवार, सागर मने बांधकाम सभापती नगरपरिषद आरमोरी, सामाजिक कार्यकर्ते मोन्टु उर्फ जगदीश पिलारे. किशोरभाऊ बालपांडे रुई, भाग्यश्री अलोणे,प्रा. डी. के मेश्राम, माजी सरपंच भारत मेश्राम, सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे ,), सचिव मनीषा महाकाळकर, संजय प्रधान ग्रा. पं. सदस्य, घनश्याम मेश्राम ग्रा. पं. सदस्य, कोमलताई मेश्राम ग्रा. पं. सदस्य, अस्विनी दोनाडकर ग्रा. पं. सदस्य, मंदाबाई सहारे ग्रा. पं. सदस्य, मंगेश दोनाडकर माजी सरपंच, मुख्याध्यापक झुरमुरे सर, योगेश ढोरे खरकाला, तोंडरे सर मुख्याध्यापक बेटाला, नन्नावरे बाबूसाहेब, मंगलाबाई तोंडरे, लक्ष्मीबाई दोनाडकर, इंदुताई मेश्राम, सुनंदाताई मुरस्कार, विनोद दोनाडकर, विलास मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य विदर्भस्थरीय खंजरी भजन स्पर्धेच्या उद्घाटक प्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले कि, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आपल्या समाज घडणीमध्ये अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे साहित्यिक योगदान असंख्य आणि उच्च दर्जाचे आहे. त्यांनी भजने, अभंग, ओव्या आणि धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय शिक्षणावर हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये अनेक लेख लिहिले आहेत. ते अनेक कला आणि कौशल्यांचे जाणकार होते. अध्यात्मिक क्षेत्रात ते एक उत्तम योगी म्हणून ओळखले जात होते, तर सांस्कृतिक क्षेत्रात ते उत्तम वक्ते आणि संगीतकार म्हणून ओळखले जात होते. त्यांचे व्यक्तिमत्व अतुलनीय आणि अद्वितीय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते आणि त्यांची शिकवण, विचार पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त आहे.
विदर्भस्थरीय खंजरी भजन स्पर्धेमध्ये विदर्भातील एकूण २९ भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये ९ महिला भजन मंडळ तर २० पुरुष भजन मंडळांचा समावेश आहे. रात्रभर चाललेल्या या भव्य भजन स्पर्धेचे पहिले स्पर्धेचे पहिले बक्षीस रोख ११ हजार रुपये अखिल भारतीय पुरुष सेवा मंडळ हिरापूर बोथली यांनी पटकावले तर स्पर्धेचे दुसरे बक्षीस रोख ९ हजार श्री गुरुदेव सेवा मंडळ विहीरगाव यांनी पटकावले तर महिलांमध्ये गुरुबाबा भजन मंडळ आंवळगाव तर दुसरे बक्षीस ढोकनाबाई माता महिला भजन मंडळ कवठा यांनी पटकावले तर तिसरे बक्षीस बरडकिन्ही येथील श्री गुरुदेव महिला भजन मंडळींनी पटकावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राऊत यांनी केले तर आभार पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांनी मांनले. कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून मोतीराम चौधरी पुरुषोत्तम डोंगरवार सर ब्रह्मपुरी, मोरेश्वर ठाकरे ब्रह्मपुरी यांनी काम पाहिले. व विशेष म्हणजे वंदनिय राष्ट्संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त गावातील कु. मोनाली ढोरे व रोहित राऊत हे दोघे जण नौकरीला लागल्यामुळे त्यांच्या वडील-आई चा शाल, श्रीफळ व राष्ट्संत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे गावात एक आदर्श निर्माण झाला आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणमोचन येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महोत्सव कमिटी व नवीन आबादी येथील श्री गुरुदेव भक्त मंडळी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.