जय संताजी तेली समाजाच्या समाज भवनाचे थाटात भूमिपूजन  

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

चिमूर विधान सभेचे आमदार किर्तिकुमार भांगडीया यांच्या निधीतून मंजुर करण्यात आलेल्या तेली समाज भवनाचे भूमिपूजन आमदार बंटी भाऊ भांगदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी बंटी भाऊ भांगडीया हे होते तर प्रमुख पाहुणे राजू देवतळे उपाध्यक्ष भा.प्र. ओबीसी, बबनराव कामडी माजी अध्यक्ष तेली समाज, भगवान देशमुख अध्यक्ष, राजेश घिये उपसरपंच, संजय डफ सचिव, अर्चना कामडी महीला सचिव, सुरेखा कामडी महीला कार्यकारणी अध्यक्ष, ग्राम पंचायत चे सर्व सदस्य, सदस्या, वामनराव मदन कर, वसंत बडवाईक माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच छाया मदनकर,प्रा, अतुल कामडी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त खुशाल मदनकर, रमेश बावनकर,बाळू कामडी, भाजपा तालुकध्यक्ष संतोष रडके, सुनिता मदन कर, इंदुताईआंबोरकर,सुधाकर कामडी, व तेली समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार बंटी भाऊ म्हणाले की समाजाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. आपल्या क्षेत्रात प्रत्येक तालुक्यात,प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नबानगर ,चिटणीस पुरा, अनुसया कॉलनी, भट्टी वॉर्ड, झेंडा चौक, बाजार रोड, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इत्यादी ठिकाणीं विकास कामांचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला.यावेळी नागरिकांचा भरपूर सहभाग होता. तलोधी गावाचा विकास कामाला दोन करोड रुपये मंजुर करण्यात आले. त्यामुळे गावातील चौकाचौकात बंटी भाऊ चे आभार मानण्यात येत असल्याचे बॅनर झडकत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे सचिव संजय डफ यांनी केले तर संचालन संजय अगडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल कामडी यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते त्यानंतर भोजनदानाच्या कार्यक्रम घेण्यात आला.