ब्रम्हपुरीच्या सुपुत्राची यवतमाळ च्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

मूळ ब्रम्हपुरी चे सुपुत्र असलेले डॉ पवन बन्सोड यांची यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून वर्णी लागलेली आहे. २०१६ च्या भारतीय पोलिस सेवेतील बॅच चे डॉ पवन बन्सोड यांची यापूर्वी औरंगाबाद ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. विशेष म्हणजे यापूर्वी मूळचे ब्रम्हपुरी येथील विनय कारगावकर यांनी सुध्दा १९९८ दरम्यान च्या कालावधीत यवतमाळ च्या पोलिस अधीक्षक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. ब्रम्हपुरी च्या दोन्ही सुपुत्रांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पदी लागलेली वर्णी ही ब्रम्हपुरीकरासाठी भूषणावह बाब म्हणावी लागेल.