श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
पोंभूर्णा/२९ ऑक्टोबर.
पोंभूर्णा तालुका भाजपाच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात नुकताच तालुक्यातील गुणवंत युवकांचा सत्कार करण्यात आला. पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे यांचा बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कास्यपदक जिकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये सहभाग होता.त्याचा सत्कार भाजपाच्या वतीने करण्यात आला. सोबत त्यांच्या वडीलांचा पण सत्कार करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी देशात उद्योजक तयार व्हावे यासाठी स्टार्टअप इंडिया योजना आणली, त्यामध्ये घोसरी येथील युवक भूपेश सुनिल निमसरकार या युवकाने सहभागी होत आपल्या कल्पकेतून उद्योगाच्या प्रेझेंटेशन मध्ये भूपेश राज्यात दुसरा आला त्याचा सुध्दा सत्कार करण्यात आला. भविष्यात त्याला त्याचा व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे अशा दोन्ही युवकांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. भैरव दिवसेंमुळे तालुक्यातील युवकांना खेळण्याची प्रेरणा मिळेल आणि भूपेश निमसरकार अगदी १२ वी शिकलेला मुलगा सुद्धा स्वतःच्या जिद्द चिकाटीने स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. या दोन्ही युवकांकडून तालुक्यातील युवकांनी बोध घेत बरेच शिकण्यासारखे आहे,असे तालुका भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम,नगरपंचायत उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार,माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार,माजी उपसभापती विनोद देशमुख, भाजपा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे,महामंत्री हरीश ढवस, ओमदेव पाल,नगरसेवक संजय कोडापे, अविनाश ढोंगे, श्रीकांत वडस्कार उपस्थित होते