नगरपंचायत सिंदेवाही-लोंनवाही येथे नगर पथविक्रेता समिती गठीत

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

नगरपंचायत सिंदेवाहि-लोंनवाही येथे “पथ विक्रेता अधिनियम :- 2014 अन्वये शासनस्तरावर शासन निर्देशानुसार शहरातील पथविक्रेता समीती स्थापन्न करण्यात आली आहे
नगर पंचायत च्या सभागृहात पार पडलेल्या सभेला नगराध्यक्ष स्वप्नील कावळे उपाध्यक्ष मयूर सूचक उपस्थित होते या समिती मध्ये शासकीय, अशासकीय आणि पथविक्रेता या गटातून सदस्यांची निवड करण्यात आलेली असून “पथ विक्रेता गटातील सदस्य यांची निवड ही तातपुरत्या स्वरूपातील असून पुढील कामगार आयुक्त यांच्या आदेशापर्यंत ते सदस्य म्हणून कायम राहतील या “पथ विक्रेता समीती मध्ये शासकीय गटातुन डॉ सुप्रियाजी राठौर प्रभारी मुख्याधिकारी या पदसिद्ध अध्यक्ष राहतील तसेच ,पोलीस निरीक्षक योगेश घारे साहेब,डॉ सुने आरोग्य अधिकारी, प्रसाद राठोड नगर रचनाकार विभाग शरद सावसाकडे वाहतूक पोलीस हे पाच समितीचे सदस्य राहतील पथ विक्रेता समितीतून शारदा थेरकर,नंदा मेश्राम, ललिता निकुरे,हेमंत चकोले, कवडू मसराम,हरीश मसराम ,बंडू बेलदावार विजय हे सदस्य राहतील,तसेच अशाशकीय गटातून विवीध क्षेत्रतील सदस्यामध्ये युनूसभाई शेख,संस्थात्मक गटातून बाबुरावजी रामटेके,पत्रकार संदीप बांगडे,महिला बचत गटातून संगीता कोलते ,व्यापारी गटातून महेश डेंगाणी,श्रीकृष्ण बोरकर पानं संघ प्रतिनिधी, अन्वेष बडोले बँक प्रतिनिधी इत्यादीची निवड करण्यात आली
यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाणी सदर समिती स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट करून शासकीय योजना त्यांच्या पर्यंत पोहचवणे आणि आर्थिक स्थैर्य मिळावे हा मुख्य उद्देश आहे इतरांनी देखील सविस्तर मार्गदर्शन केले
आणि सर्वप्रथम पथविक्रेत्यांनी नगरपंचायत येथे सदर विभागाशिं संपर्क साधुन प्रथम “पथविक्रेता म्हणून आपली नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी असे आवाहन करण्यांत आले आहे