बिबट्या च्या हल्ल्यात शेतकरी ठार -राजुरा तालुक्यातील तुंमागुडा (विरुर ) येथील घटना

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

विरुर स्टेशन 

शेतात जागल करण्याकरिता गेल्या एक 55 वर्षीय इसमाला माऱ्यावर चढून बिबट्याने हल्ला करून दोनशे मीटर अंतरावर नेऊन त्या शेतकऱयांचा बळी घेतल्याची घटना आज सुमारास सकाळी चार वाजता विरुर स्टेशन जवळील सुब्बाई तुम्मागुडा येथे घडली ,सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

यात सविस्तर असे की विरुर वरून अगदी पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुरा तालुक्यातील सुब्बई तुम्मा गुडा येथील भीमा प्रभू घुगोलत वय 55 हा नेहमी प्रमाणे आपल्या शेतात जंगली जनावरकडून होत असलेल्या पिकाची नासधूस राखण्याकरिता शेतात गेला व शेतात असलेल्या सात फिट उंचीच्या मचाणीवर बसून आपल्या शेतीच्या पिकाचे रक्षण करीत होता मात्र दब्बा धरून असलेल्या बिबट्याने जगाल करीत असलेल्या मचाणी वर चढून भीमाला दोनशे मीटर लांब नेऊन त्याचा जीव घेतला ,सोबत असलेल्या बाजूच्या शेतातील यांनी आरडाओरडा केली मात्र भीमा याचा जीव गेला होता व बिबट्याने तिथून पलायन केले सदर घटनेमुळे शेतकऱ्यां मध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ विरुर वनपरिक्षत्राधिकारी पवार व त्याची टीम व विरुर पोलीस ठाणेदार चव्हाण व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचली घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आले

सदर घटनेमुळे परीसरातील जनतेत असंतोष पसरल्यामुळे काही काळ नागरिकांनी घटनेचा तीव्र विरोध दर्शीवला तेव्हा मृतक परिवाराला 25 हजार रोख रक्कम देऊन शासनाकडून मिळणार आर्थिक मदत लवकर देऊ मृतकाच्या मुलाला वनविभागात सेवेत रुज्जू करू असे आश्वासन देण्यात आले