हे 1985 पासून आजही चालवतात राष्ट्रसंताच्या भजनाचा वसा

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

ब्रम्हपुरी 
तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील श्री गुरुदेव भजन मंडळ 1985 पासून गावोगावी भजन करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा वसा आजही जोपासत आहेत.
राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा प्रसार व पसार घरा-घरात व्हावा,प्रत्येक घरात राष्ट्रसंतांचे विचार पसरून त्याचा उपयोग समजला व्हावा,प्रत्येकाने आदर्श जीवन जगावे या उदात्त हेतूने हे मंडळ आजही समाजकार्य करीत आहेत.भजन,कीर्तन,पोवाडे,नकला,भागवत इत्यादींच्या माध्यमातून संतांच्या कार्याचा प्रसार करत समाजात रूढ असलेल्या जुन्या चालीरीती,रूढी-परंपरा,अंधश्रद्धा,हुंडाबली यांच्यावर मारा करत समाज जागृतीचे कार्य करीत आहेत.मागील 36 वर्षापासून त्यांच्या या कार्याने परिसरात त्यांची वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. हे केवळ त्यांच्या कलेनेच,त्यांनी आजतागायत हजारो समाजजगृतीचे कार्यक्रम करून,विविध स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके जिंकली आहेत.श्री गुरुदेव भजन मंडळाचे बाळकृष्ण टेंभुरकर,ललित राऊत,राजेंद्र ठेंगरे,तुलाराम वासनिक,अविनाश दाणी,सुनील राऊत,सुरेश बनकर,सुभाष करंडे, नानाजी बगमारे,सौ.सुलभाताई ठेंगरे,दुशांत ठेंगरे,भारत कुथे पिंपळगाव,सौ.सुनंदाबाई डोलारे भालेश्वर,लालाजी ढोरे सोनेगाव यांच्या प्रेरणेने परिसरातील नवयुवक मंडळीं सुद्धा या भजन,कीर्तन,नकला,अध्यात्मिक प्रवचन प्रवाहात आल्याने परिसरातील नागरिक अध्यात्मिकतेकडे वळले असून त्यांच्या कार्याचे व कलेचे गुणगान आत तालुक्याबाहेरही व्हायला लागले आहे.