अवैध दारुविक्रेत्याचा सरपंचावर हल्ला,चंदनखेडा येथील घटना.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

भद्रावती पोलिसात तक्रार दाखल.
भद्रावती.
अवैध दारु विकणे बंद कर असे हटकले म्हणुन एका अवैध दारुविक्रेत्याने सरपंचावर हल्ला करुन त्यांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चंदनखेडा येथे घडली.या प्रकाराची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असुन पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. चंदनखेडा येथील महिलांनी गावात अवैध दारु विक्री करणाऱ्या सुधीर दोहतरे यांच्या घरावर धाड टाकली व सरपंच नयन जांभुळे व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज हनवते यांना घटनास्थळी बोलाविले.त्यानुसार दोघांनिही घटनास्थळी जाऊन सरपंच नयन जांभुळे यांनी दारुविक्रेता सुधीर दोहतरे याला अवैध दारु विक्री बंद कर म्हणुन हटकले यावर दोहतरे हा सरपंच जाभुळे यांच्या अंगावर धाऊन आला व बुक्यांनी त्यांना मारहाण केली. यात जांभुळे यांच्या डोक्याला व छातीला मार लागला.या घटनेची तक्रार सरपंच नयन जांभुळे यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात केली.त्यानुसार पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.