श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती
भद्रावती तालुक्यातील वाघां च्या दिवसेंदिवस घटना पाहता भद्रावती तालुक्याला चहूबाजूनी वाघांनी घेरले आहे ,असे म्हटल्यास वागवे वाटू नये तसे वन्य प्राण्याचे दर्शन हे तालुक्यासाठी नवे नाही तालुक्यातील चोरा, चंदनखेडा, काटवल ,मूधोली, मांगली, वायगाव, आष्टा आधी जंगलामधील, जंगला नजीक असलेल्या गाव, शिवारात वाघ आणि बिबट्यांचे नित्य दर्शन होत असते .मात्र हळूहळ वाघांनी आपला मोर्चा तालुक्यातील जंगलांचा प्रदेश नसलेल्या परिसरातील वळविल्याने आता तालुक्यातील जवळपास सर्वच भागात वाघ व बिबट्यांनी व्यापला आहे. भद्रावती शहरातील आणि निर्माणी परिसरात तर कित्येक वर्ष वाघ व बिबटे सर्रासपणे वावरत आहे. या वाघ व बिबट्यांनी अगदी शहरातील अनेक प्रभागात पर्यंत कूच केले आहे. मात्र हा परिसर आधीपासूनच जंगलाने व्याप्त असल्यामुळे तेथे या वन्य प्राण्यांचे दर्शन काही आश्चर्याचे नाही. मात्र गेल्या एक-दोन वर्षात शहरालगतच्या बरांज व तालुक्यातील चारगाव व माजरी परिसरात पट्टेदार वाघांचा वावर हा धक्कादायक आहे. अगदी माजरी गावाला मागील आठवड्यात वाघाने एका युवकाला ठार मारून आपली दहशत कायम ठेवली आहे .तर चारगाव तथा परिसरात एका वाघा च्या कुटुंबाने गावकऱ्यांना नित्य दर्शन देत गावकर्त्यांमध्ये आपला वाचक कायम ठेवला आहे. तिकडे चिरादेवी परिसरातही वाघ दिसण्याच्या घटना एकवित आहे. थोडक्यात तालुकाच्या सभोवताल वाघाने आपले साम्राज्य पसरविले आहे व ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे .भद्रावती तथा परिसरात वेकोली च्या बंद पडलेल्या निर्जन कोळसा खाणी व या परिसरात निर्माण बाबू तथा इतर वनस्पतींचे जंगल या वाघांना राहण्यासाठी आदर्श ठिकाण झालेले आहे. बंद पडलेल्या खाणीत असलेले मुबलक पाणी, लपण्यासाठी आदर्श ठिकाण व या परिसरात असलेली मोठ्या प्रमाणा वरील रानडुकरे ,रोही व शेतकऱ्याची पाळीव जनावरे याकडे वाघांनी या भागात बसतात मांडून आपली संख्या वाढवणे सुरू केले आहे .वाघांना मारणे हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे त्यांना कायद्याचे अभय मिळाले असल्यामुळे ते बिनधास्तपणे या भागात वावरत आहे. त्यांचा त्रास मात्र आता मानव जीविताला होऊ लागला आहे. मानव आणि वन्य प्राणी यातील संघर्षाचा पेच सोडविण्यात वन विभागहि आता असमर्थ ठरला आहे. एकीकडे गावकऱ्यांचे दडपण आणि दुसरीकडे या प्राण्यांचे संरक्षण अशा गोची त वन विभाग सापडला आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची कोणतीही योजना नसल्याने केवळ सतर्कता बाळगा एवढे आव्हान करण्याचे काम वनविभाग कडे राहिले आहे .मात्र या वाघांचा बंदोबस्त करून या संकटातून गावकऱ्यांना कसे मुक्त करावे हे हा वनविभाग सांगू शकत नाही. तो या वन्य प्राण्यांच्या वाढत्या प्रादुर्भावा पुढे अगदी हतबल झाला आहे .भविष्यात वाघ बिबट्यांचे संकट हे आणखी तीव्र होणार आहे. मात्र या संकटाला सामोरे जाण्याची वन विभागाकडे कोणतीच उपाययोजना नसल्यामुळे परिसरातील मानव व वन्य प्राणी संघर्ष आणखी तीव्र होऊन ती वनविभागाच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.