श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
व्याहाड
आझादीका अमृत महोत्सानिमित्त सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व्याहाड खुर्दच्या ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँडव्होकेट धनंजय आंबटकर,तालुका बार असोसिएशनचे सचिव अँडव्होकेट आदर्श गेडाम विधी सेवा समिती सदस्य डॉ. शडाकांत कवठे व्याहाड खुर्दच्या सरपंच सुनिता उरकुडे, सुरेश गोडसेलवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्वतः मध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा व गुन्हेगारीपासून अलिप्त राहण्यास मदत होईल यावर अँडव्होकेट धनंजय आंबटकर यांनी मार्गदर्शन केले.