चंद्रपूर जिल्हा शेतकरी महासंघाची स्थापना

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

भद्रावती – महासंघाची स्थापना करून शेतकरी एकत्र येऊन कृषी विपणन, पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता बाजार संपर्क वाढण्याचे साठी बियाणे खते निर्मितीसह इत्यादी उपायोजना शेतकऱ्यांसाठी करण्याकरिता नुकतीच कृषी भवन येथे झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शेतकरी कंपनी महासंघाची स्थापना करण्यात आली.

बैठकीला विनायक धोटे, सुधीर मुडेवार, आबित अली, नरेंद्रजी जिवतोडे, यशवंत साखरे, डॉ. निलेश वावडे, भोला मळावी आधी मान्यवर उपस्थित होते शेतकरी कंपनी महासंघाची स्थापना कशासाठी केली याकरिता मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शेतीचे दिवस बदलले, शेती करणारे बदलले, यांत्रिक अवजाराचा वापर वाढला घरचे राबनारे हात कमी झाले, बियाणे खते कीटकनाशके विकत घ्यावे लागतात एकंदरीत शेतीचा खर्च वाढला.

पाच ते सहा वर्षात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपन्या स्थापन केले आहेत चंद्रपूर जिल्ह्यासह ६० हजार शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या ६५ शेतकरी कंपन्या तयार झाल्या आहेत व त्या शेतकऱ्यांना सुविधा देत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी देण्यात आला आहे या जिल्ह्यातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन जिल्हा शेतकरी कंपनी महासंघाची स्थापना करण्यात आली.