श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
आई महिला ग्रामसंघ, क्रांतिज्योती महिला ग्रामसंघ आणि ग्रामपंचायत यांचा पुढाकार
रत्नापुर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान पंचायत समिती सिंदेवाहींतर्गत आई महिला ग्रामसंघ, क्रांतिज्योती महिला ग्रामसंघ आणि ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूर यांच्या संयुक्त वतीने रत्नापूर ता.सिंदेवाही जि. चंद्रपुर या गावात प्रथमच आठवडी बाजार भरविण्यात आला.आणि दि:6/11/22 ला रीतसर मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
रत्नापूर हे सिंदेवाही तालुक्यातुन दूसरी क्रमांक असलेली मोठी ग्रामपंचायत आहे, मात्र, या गावात आतापर्यंत आठवडी बाजार भरत नव्हता. त्यामुळे नागरिकांना तीन किमीवर असलेल्या नवरगावात बाजारासाठी जावे लागत असे.आणि त्यामुळे रत्नापुर येथेआठवडी बाजार सुरु झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
या उदघाटन प्रसंगी माजी जि. प. सदस्य रमाकांत लोधे, माजी जी.प. सदस्य राजेंद्र बोरकर, सरपंच कविता सावसाकडे उपसरपंच अशोक गभणे, माजी सरपंच सदाशिवराव मेश्राम, वासुदेव दडमल,मंगेश मेश्राम, नेताजी गहाणे, उषाताई धारणे, हर्षद रामटेके, आई महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष अजमीना शेख, क्रांती ज्योती महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष निरंजना मेश्राम, तंमुस अध्यक्ष बालाजी लेंझे, समतादूत कृपाली धारणे, माया सहारे, भाविक श्रीरामे, शिल्पा ढोणे, भुवनेश्वरी श्रीरामे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामसंघाच्या सदस्य, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य,आई महिला ग्राम संघच्या महिला सदस्य, पदाधिकारी, गावकरी आणि आठवडी बाजारात सहभागी झालेले विक्रेते, ग्राहक मोठ्या प्रमाणात होते.आठवडी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर होते. या रत्नापुर येथे शेतकरी वर्ग धाना बरोबर काही शेतकरी भाजीपाला पिकवितात या शेतकार्यना या बाजारचा फायदा होईल.यासंबंधाने ग्रामपंचायत व महिला संघाची बैठक घेऊन रविवारी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले. शेतमाल गावात विकण्याची संधी गावकऱ्यांना गावातच उपलब्ध झाली पाहिजे,आणि त्यांना या आठवडी बाजारातून आर्थिक फायदा होईल ही बाब महिला ग्रामसंघाच्या लक्षात आल्यानंतर महिला ग्रामसंघाच्या वतीने ही रत्नापुर येथील आठवडी बाजाराची कल्पना अस्तितत्वात आली.