भुवन भोंदे द्वारा
देसाईगंज
देसाईगंज येथील शिवाजी वार्डा मध्ये बिरसा मुंडा जंयती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली पाणी जंगल आणि भुमी साठीची लढाई शतके जुनी आहे या लढाईसाठी शेकडो नायक आले आणी गेले परंतु हा लढा आजही कायम आहे आज आम्ही असा मोहक व बंडखोर नेत्या बदल बोलत आहे ज्यांच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणी त्यानी इंग्रजाना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजावर वार केले. आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी नेते व लोक नायक होते त्यांचे पुर्ण नाव बिरसा सुगान मुंडा होते त्याच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंड मधील कुटी जिल्ह्यातील उलिहातु रांची येथे झाला त्याच्या आई नाव करमी हतु होते त्याचा मुत्यु १९०० मध्ये झाला १९ शतकांतील बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे लोक नेते म्हणून उदयास आले आदिवासींना लाभलेला त्याच्या भुमि युध्दाचा वारसा शतकानुशतके प्राचीन आहे मुंडा आदिवासींच्या नेतृत्वात १९ व्या शतकातील नायक बिरसा मुंडा यानी महान असी एक चळवळ उभी केली या चळवळीलाच उलगुलान असे म्हणतात
असा या थोर महान भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देसाईगंज शिवाजी वार्डा मध्ये साजरी करण्यात आली जयंती निमित्त प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तिरु जे. पी. लोंढे साहेब SDM देसाईगंज यांनी पुष्प हार अर्पण केला व कार्यक्रमाचे मा. तिरु संतोष महाले साहेब तहसीलदार देसाईगंज यांनी यांनी दिप व धूप प्रज्वलीत केले या प्रसंगी तिरु भारत मरर कोल्हे SRPF, मनोज पंधराम SRPF, प्रभाकर कुभोरी SRPF, मा. राजरतन मेश्राम पत्रकार व आदि उपस्थित होते