श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज १९ /११/२०२२
देसाईगंज तालुक्यातील कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक (मुले) केंद्र शाळेच्या मोठी दुरुस्ती बांधकामावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्यवान रामटेके यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना करताच जिल्हा परिषद गडचिरोली समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता व देसाईगंज पंचायत समिती समग्र शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीचे पूर्णपणे निराकरण न करता मोका तपासणी अहवाल वेगळाच दिला असल्याने कुठेतरी पाणी मुरल्या गेले असावे अशी शंका बळावली जात आहे.समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक (मुले) केंद्र शाळेला सुरुवातीला २९ ऑक्टोंबर २०२० रोजी ५०% निधीचा पहिला हप्ता रुपये – ९ लाख २५ हजार इतकी रक्कम शाळेला बांधकामाच्या दुरुस्ती करीता देण्यात आली सदर बांधकामावर साहीत्य खरेदीचे दरपत्रक न मागविता साहित्य खरेदी काही साहित्यांचे दर अवाढव्य रेतीची विना वाहतूक परवाना खरेदी १२ खिडक्यांची दुरुस्ती प्रोफाइल शीट किलोप्रमाणे खरेदी बोगस मजूर दाखवून रकमेचा अपहार व इतर बाबींविषयी दिनांक- १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना सत्यवान रामटेके यांनी तक्रार दाखल केली होती.तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास मोका तपासणी अहवालाची प्रत वा तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली याची प्रत द्यायला हवी होती मात्र तसे न करता बराच कालावधी लोटूनही तक्रारीचे काय झाले? यासाठी रामटेके यांनी ३० ऑगष्ट २०२२ रोजी समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद गडचिरोली यांना माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली जनमाहिती अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी १९ सप्टेंबर २०२२ रोजी माहिती दिली माहितीमध्ये कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद गडचिरोली समग्र शिक्षा अभियान व कनिष्ठ अभियंता देसाईगंज पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान यांनी मोका तपासणी केल्याचे नमूद केले आहे त्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुड दुरुस्ती कामाला ५०% निधी दिल्याचे सांगितले व त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती यांनी निधीच्या अधीन राहून बांधकाम केले असल्याचे दिसून आले व कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचे अभिप्राय दिले विटा जुडाई प्रोफाइल शीट खिडकी-०६ दरवाजे ०६ व प्लास्टर – या सर्वांचा दर्जा चांगला आहे व चांगल्या दर्जाचे काम केल्याचे पत्रात सांगितले व मोका तपासणी अहवाल दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी केला असल्याचे पत्र देण्यात आले यामध्ये कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी मोका तपासणी केला असल्याचे रामटेके यांना पत्र दिले.रामटेके यांनी कुरुड जिल्हा परिषद प्राथमिक (मुले) केंद्र शाळेला दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ रोजी शाळेला कोणकोणत्या अधिकारी वा कर्मचारी यांनी व्हिजिट दिले असल्याची माहिती मागितली असता शाळेच्या व्हिजिट बुक रजिस्टरमध्ये कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याने वा अभियंत्याने भेट दिली नसल्याचे १९ ऑक्टोंबर २०२२ रोजी शाळेकडून पत्र प्राप्त झाले असल्याने कोणत्याही प्रकारची मोका तपासणी केली नसल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे तक्रारिमध्ये नमूद काय? व तपासणी कोणती केली गेली? यावरून कुठेतरी भला मोठा पाण्याचा साठाच मुरला गेला असल्याने सर्व प्रकरण उघकिस आणणार असल्याचे रामटेके यांनी म्हटले आहे.
हे हि वाचा
देसाईगंज पोलीस विभागाचे दुर्लक्ष शिरपूर मार्गे जंगल परिसरात अवैधरित्या चालतो जोरात कोंबडा बाजार