श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२०/११/२०२२
देसाईगंज
सध्या देसाईगंज शहरात दिवसेंदिवस येथील सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पार्टीत प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे , आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष पशु मित्र प्रकाश जिवानी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग आम आदमी पक्षात प्रवेश करीत असल्याची चर्चा शहरामध्ये सुरु असल्याचे दिसून येत आहे.
देसाईगंज येथील कनमवार वार्डातील सामाजिक कार्यकर्ता आषिश कोवे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला , त्यामुळे देसाईगंज शहरात आम आदमी पार्टीची ताकद वाढली आहे , आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी ला यश प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही