स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात देखील आदिवासी विकासापासून कोसो दूर – शिक्षक आमदार मा. कपिल पाटिल

श्री.अनिल गुरनुले,अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

अहेरी, दि.२१//११/२०२२२

अहेरी येथे शिक्षक भारतीचा शिक्षक मेळावा संपन्न

देश एका बाजुला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण या देशातील मुळ मालक असलेला आदिवासी आजही विकासापासून कोसो दूर आहे. पारतंत्र्य काळात आदिवासी मधिल जननायक बिरसा मुंडा, गडचिरोली जिल्ह्यातील क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे सारख्या आदिवासी विरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळविण्यात मोलाची भुमिका पार पाडली. परंतु इथल्या प्रस्तापितांनी त्याच्या सोईनुसार इतिहास लिहून आदिवासींचे हक्क नाकारत आहे. असे प्रतिपादन ते यावेळी अहेरी येथे शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित शिक्षक मेळाव्यात  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते

यावेळेस मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार हे होते. तर उद्घाटक म्हणून मा. अतुल देशमुख समन्वयक शिक्षक भारती महाराष्ट्र हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. राजेंद्र झाडे सर राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, भाऊराव पत्रे विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती नागपूर, संजय खेडीकर राज्य कार्यवाहक, किशोर वरभे राज्य संघटक सचिव, सपन नेहरोत्रा विभागीय कार्यवाहक शिक्षक भारती नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अतूल देशमुख, राजेंद्र झाडे सर यांनी सुद्धा उपस्थित शिक्षक व जनसमुदायास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विष्णू दुनेदार सर यांनी केले तर प्रास्तविक अरुण मुनघाटे सर तर आभार पुंडलिक देशमुख सर यांनी मानले. यावेळी भामरागड, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील शिक्षक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.