कोशारी व त्रिवेदीला प्रहारतर्फे जोडेमारो आंदोलन

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२२/११/२०२२..ब्रम्हपुरी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एकेरी भाषेत शब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. अलीकडे राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केली . इतकेच नव्हे तर यापूर्वी सुद्धा राज्यपाल कोशारी यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सार्वजनिक कार्यक्रमातून बोलतांना आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तसेच भाजपाचे केंद्रीय मंत्री सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ वेळा मुघलांची माफी मागितली असे बदनामीकारक विधान केले आहे. त्यामूळे कोशारी आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाची मने दुखावली गेली आहे. करीता या घटनेचा निषेध करीत प्रहारतर्फे कोशारी आणि त्रिवेदी यांना चपला – जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे व दोषीं कोशारी आणि त्रिवेदी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनशक्ती पक्षाचे वतीने ॲड.हेमंत उरकुडे,ॲड.सुधीर तलमले, ॲड. संतोष रामटेके , सुनील भोयर, देशमुख ,लतेश रामटेके,,होमराज राऊत,हरीचंद्र ठेंगरे, बंडू उरकुडे, डाकराम ठेंगरे,प्रशांत दाणी,दिनेश गाताळे, संजय सहारे, रामलाल तुपट आदींच्या वतीने करण्यात आली.