छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही-सरफराज शेख

राज्यपालांना हटविण्याची मागणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान करणारे विधान करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाही.राज्याचे राज्यपाल यांना त्वरित महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे चंद्रपूर जिल्हा नेते  सरफराज शेख यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आम्हचे आदर्श असून त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्य विधान सहन केल्या जाणार नाही.अपमानजनक व्यक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी व सरकारने त्यांना त्वरित हटवावे अशी मागणी करण्यात येत आहे.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे घटमात्मक पद सांभाळणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी यापूर्वीही महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांबाबत बेताल व्यक्तव्य करून अपमान केला आहे.भगतसिंग कोशारी विकृत बुद्धीचे असून वारंवार महापुरुश्यांचा अपमान करीत आहेत.त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नाही.राज्यपाल कोशारी यांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी व महाराष्ट्र सरकारने त्यांना तात्काळ या पदावरून हटवावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा बसपा नेता सरफराज शेख यांनी केली आहे.अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.