श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
.
राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे वन विभागाला निवेदन.
दि.२४/११/२०२२
भद्रावती
माजरी एरियातील ढोरवासा , तेलवासा, नवीन कुनाडा, जुना कुनाडा, माजरी या बंद खाणीच्या परिसरात वाघाचे मोठ्या प्रमाणात वावर तयार झाले आहे त्यामुळे या परिसरात पाळीव जनावरांची शिकार होत आहे काही दिवसापूर्वी माजरी कामगार वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना घडली त्यामुळे या मार्गाने विविध खाणीत जाणाऱ्या पाचशे कामगाराचा जीव धोक्यात आला आहे या वाघाचा बंदोबस्त करावा या साठी राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या वतीने वन विभागाला निवेदन दिले.
वेकोलीच्या माजरी एरियाच्या परिसरात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच खाणीच्या मार्गाने पाचशे कामगार नागलोण, माजरी, एकोणा या खुल्या कोळसा खाणीत दुचाकीने कामगार कामावर जात असतात या मार्गाने जाणारे बहुतांश कामगार एकता नगर वसाहत, तेलवासा, ढोरवासा, चारगाव , देऊरवाडा, कुनाडा, माजरी कॉलनी या परिसरातील आहे कित्येकदा कामगारांनी या मार्गावर वाघाला प्रत्यक्षदर्शी मुक्त संचार करताना बघितले आहे. त्यातच दिनांक २४ ऑक्टोबरला माजरी कॉलनी येथील कामगार दिपू महतो वाघाच्या हल्यान ठार झाल्याची घटना घडली या प्रकाराने कामगार पूर्णता वाघाच्या दहशतीत आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरे लावून वाघाला जेरबंद करावे या मागणीचे निवेदन राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी एच पी शेंडे यांना दिले यावेळी इंटक नेता धनंजय गुंडावार , संजय दुबे, चंद्रकांत बोढाले, साईनाथ वाकुलकर, रवी आवारी, अनंता आंबिलकर, बाबा अस्वले, ओमप्रकाश वैद्य, दत्तू शैताणे, बापूजी पारखी आधी उपस्थित होते.