घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अज्ञात व्यक्तीसोबत आर्थिक वव्यहार करू नये- अक्षय सुक्रे बिडिओ सिंदेवाही

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि. १/१२/२०२२

सिंदेवाही

सिंदेवाही पंचायत समिती पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेसाठी घरकुल मंजुरी मिळवून देण्याकरता अज्ञात व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्या जात असल्याचे तक्रार प्राप्त होताच पंचायत समिती बिडीओ अक्षय सुक्रे यांनी या प्रकारे आव्हान केले आहे. कि प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण क” किंवा ड” यादि मधील लाभार्थ्यांची निवड शासन स्तरावर ऑनलाइन मंजुरी करण्यात येते. तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या संबंधित विभागामार्फत राबविण्यात येते. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील लाभार्थ्यांनी परस्पर कोणासोबतही पैशाच्या व्यवहार करू नये किंवा कोणी घरकुल मंजूर करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल तर लाभार्थ्याने थेट सिंदेवाही पंचायत समिती बिडिओ यांच्याकडे किंवा एसीबी कडे तक्रार करावे.असे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेस सिंदेवाही पंचायत समिती चे बिडिओ अक्षय सुक्रे यांनी केले आहे.