ग्रामपंचायत मुडझा येथे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर समता पर्व सप्ताह

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर 

दि.२/१२/२०२२

गडचिरोली 

आज दिनांक 02/12/2022 ला ग्रामपंचायत मुडझा बु येथे दि.26/नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निर्वान दिन  या कालावधीत समता पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे  त्या निमित्य सहाय्यक आयुक्त सामाज कल्याण गडचिरोली व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विध्यमाने आज ग्रामपंचायत च्या सभागृहात अनुसूचित जातीच्या योजनेचे मार्गदर्शन कार्यक्रम व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीला भेट देण्यात आले.

सदर कार्यक्रमा चे अध्यक्ष सौं सुरेखाताई सुरपाम ग्रामपंचायत सदस्य मुडझा बु., श्री रतन शेंडे विस्तार अधिकारी गडचिरोली, अमोल भोयर विस्तार अधिकारी गडचिरोली, श्री पोटे सर, श्री सोहेल शेख सर, श्री सचिन माढरे, श्री जि. एम. काबळी, श्री हेमंत लांजेवार, श्री मनीष गणवीर, श्री शैलेश रामटेके, सौं रुपाली मपराजींत, श्री पोच्या डोंगरे, राकेश लोणारकर ग्रा. स., निरूता सुरपाम ग्रा. स., विवेक बारसिंगे ग्रा. स., लोचन ताई मेश्राम पोलीस पाटील, डी. ए. वायबसे ग्रामसेवक,  कर्मचारी व मुडझा गावातील नागरिक उपस्थित होते.