रेशन दुकानातील समस्या तातडीने सोडविण्यात यावे -रुपेश वलके रा. यु. का. विधानसभा अध्यक्ष गडचिरोली

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

गडचिरोली, दि.४/१२/२०२२

रेशन दुकानात अनेक समस्यांना तोंड देण्यात येत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ,नाव चढविने नाव कमी करणे, 2021 / 2022 या वर्षातील नवीन बनलेले शिधापत्रिका येत्या पंधरा दिवसात सुरू करणे , रेशन दुकानातील जुन्याच पद्धती प्रमाणे रेशन  2 किलो गहू,  3 तांदूळ देण्यात यावे, रेशन दुकान पर्यंत द्वारपोच योजना असून सुद्धा रेशन धारक नागरीकांना लवकरात लवकर धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत, कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांचे परिवाराला अत्योदय योजनेचे सुरक्षा कवच तातडीने देण्यात यावे, रेशन दुकानदारांचे PMGKAY कमिशन लवकरात लवकर अदा करण्यात यावे,रेशन दुकान पर्यंत नव्याने सुरू झालेली थेट वाहतूक योजना ही रेशन कार्ड धारकांना आणि रेशन दुकानदाराला परवड सारखी नसून येत्या महिन्या पासून ही योजना बंद करून पुन्हा गोडाऊन मधूनच धान्य देण्यात यावे,नागरिकांचे नवीन कार्ड जुने कार्ड नाव जोडणे नाव तोडणे हे सगळे काम आठ दिवसांत निपटिवीण्यात यावे, रेशन दुकाना मधून जुन्याच पद्धतीने महिना टू महिना मध्ये रेगुलर कंट्रोल वाटण्यात यावे,रेशन दुकान मधील Pos मशीन मधील सर्वर चा घोळ दुरुस्त तातडीने सोडविण्यात यावा आणि जानेवारी to डिसेंबर महिन्यापर्यंतचा डाटा रेगुलर आणि PMGKAY या दोन्ही गोष्टीचा डाटा Pos मशीन मध्ये टाकण्यात यावा. इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यात यावे .

वरील सगळे मुद्दे तातडीने सोडविण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे येत्या हिवाळी अधिवेशन मध्ये महसूल मंत्र्याला धारेवर धरू असा इशारा श्री.रुपेश वलके रा. यु. का. विधानसभा अध्यक्ष गडचिरोली यांनी दिला आहे

solve the isuue of retioning