जवाहरलाल नेहरू विदयालय जोगीसाखरा येथे २६ सावित्रीच्या लेकींना मोफत सायकल वाटप

गडचिरोली  जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

आरमोरी, दि.५/१२/२०२२

तालुक्यातील जवाहरलाल नेहरू विद्यालय, जोगिसाखरा येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून बाहेर गावावरून शिक्षणासाठी ये- जा करणाऱ्या सावित्रीच्या लेकीना मानव विकास मिशन च्या उपक्रमा अंतर्गत मोफत २६ सायकलीचे वाटप करण्यात आले. गुरुनानक सोशियल ट्रस्ट, देसाईगंज द्वारा संचालित जवाहरलाल नेहरू विद्यालय, जोगीसाखरा येथील विद्यार्थिनी जवळपास तीन ते पाच किलोमीटर अंतरावरून शिक्षण घेण्याकरीता सावित्रीच्या लेकी येतात त्यांच्या कडे कोणतेही साधन किवा मानव विकास मिशन अंतर्गत बस सुविधा उपलब्द नव्हती महाराष्ट्र शासनाचे मानव विकास मिशन उपक्रमा अंतर्गत सदर २६ गरजू सावित्रीच्या लेकींना विद्यार्थिनींना मोफत सायकल उपलब्ध करून दिल्यात व त्यांची शिक्षणाच्या प्रवाहात येण्या जाण्याची कायम ची पायपीट बंद करून विद्यार्थिनीच्या चेहर्यावर आनंद खुलविले. सदर कार्यक्रमास दिलीप घोडाम अध्यक्ष जंगल सोसायटी कामगार जोगिसाखरा, वृंदा गजभिये पंचायत समिती सदस्य, शेषराव कुमारे संचालक, पालक-शिक्षक संघ सदस्य देविदास प्रधान, वेलेश्वर मसराम, मोहुर्लेताई, येलमे ताई भोयर ताई शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य कृष्णा खरकाटे, शिक्षक जि.एच. रहेजा आय आर. डोके, एस. आर हटवार, डी एस नैताम अजय सपाटे, प्रेमानंद मेश्राम, यशवंत मरापे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते