महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिर आयोजन

श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर

देसाईगंज, दि. ७/१२/२०२२

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनी राहुल बुद्ध विहार किदवाई वार्ड समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात अनेक युवकांसह बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ सांगोळे यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी बौध्द समाज कोअर कमेटीचे सल्लागार विजय बन्सोड, डाकराम वाघमारे, उपाध्यक्ष साजन मेश्राम, सदस्य भिमराव नगराळे, सुरज ठवरे, नरेश लिंगायत, अंकोश गोंडाणे, सुनील सहारे, सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव खोब्रागडे, धनपाल घुटके, सिद्धार्थ गायकवाड तसेच आरोग्य विभागाच्या डॉ. विद्या बांबोळे, सेविका निता वानखेडे, बंडु कुंभारे उपस्थित होते.
या शिबिराच्या आयोजनासाठी आरोग्य विभागासह राहुल बुद्ध विहाराचे कार्यकर्ते शरद ढोक, ,निखिल सांगोळे, पलास वालदे,भिमदास ढोक,प्रितम शेंडे , शैलेश मेश्राम, तनोज भैसारे व किशोर शिवरकर.यांनी परिश्रम घेतले.