श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
देसाईगंज, दि.७/१२/२०२२
समाजात धर्मनिरपेक्षता रुजावी वंचितांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य महान आहेत. म्हणूनच ते सर्वार्थाने महापुरुष आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी असल्याचे मत आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील पदस्पर्शभूमी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, प्रा.डॉ शंकर कुकरेजा, प्रा.डॉ. विनायकजी तुमराम आदिवासी सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रा. डॉ. मोरेश्वर नगराळे कोकण कृषी विद्यापीठ दापोली, प्रा. प्रदीप विठ्ठल हिरापुरे, प्रा.मिलिंद रंगारी, प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, सुनील कुमरे, इंजी. विजय मेश्राम, चंदू राऊत, मारुती जांभुळकर, वंदनाताई धोंगडे, उद्धव खोब्रागडे, मोरध्वज शिपोलकर, साजन मेश्राम, महेंद्र सहारे, संजय मेश्राम, जगदीश रामटेके, नरेश वासनिक आदी उपस्थित होते.