शिक्षण शिवाय माणसाची उन्नती नाही – ठाणेदार अविनाश मेश्राम.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 शेगाव, दि. १२/१२/२०२२
पो स्टे शेगाव बू अंतर्गत मानोरा येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, द्वारा आयोजित नाग दिवाळी महोत्सव 2022 च्या निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम. कार्यक्रम चे प्रमुख मार्गदर्शक अविनाश मेश्राम ठाणेदार शेगाव बू पोलिस स्टेशन यांनी विद्यार्थी याना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शिक्षणा शिवाय सर्वागिक विकास होत नाही त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला समान बुध्दी असते म्हणून प्रत्येकाने त्या बुध्दी चा वापर करून स्वतःची प्रगती करू शकते. त्यासाठी बुध्दी चा विकास शिक्षण आणि निरंतर वाचन करून करता येते. बाबा साहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की मानवाचे जीवनाचा अंतिम ध्येय हे त्यांच्या बुध्दीचा विकास कसा होईल या वर असला पाहिजे. कारण जगात जे लोक हाताने काम करतात ते फक्त आपले पोट भरतात आणि जे लोक बुध्दी ने मेहनत करतात ते चैनीचे जीवन जगतात. स्पर्धा परीक्षा देऊन आपले आपण जीवन सुखी करू शकतो असे नमूद केले. प्रा सुहानद ढोक यांनी उपस्थित जनतेला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालून आपण स्वतहाचा विकास करू शकतो असे सांगून यांचा फोटो प्रत्येकानी आपल्या घरी लावावा असे विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव नागोसे यांनी पुरुषांना दारू पासून काही फायदा नाही म्हनून दारू पिऊ नये असे मत मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटने च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतले. नाग दिवाळी महोत्सव चा आज सामुदायिक भोजन तथा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन संपन्न होणार आहे.