माणसात देव शोधणाऱ्या संतांचे विचार अंगीकारावे – प्रकाश निमकर

चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर

चामोर्शी,दि. २१/१२/२०२२

“तूच शिकविले त्यास जगाया, ज्याचे नाही जगात कोणी I भुकेल्यास भाकर द्यावी ,अन तहानल्याला द्यावे पाणी ॥ ” असे आचरण असणारे आणि ज्यांनी आयुष्यभर हातात झाडू , डोक्यावर खापर हातात झाडू व गाडगे घेऊन रस्त्याची घाण साफ करणारे परंतु समाजातील दांभिकता, कर्मकांड, पुजाअर्चा, नवस, जादूटोणा आदी पाखंडी पणाचा विरोध करणारे व मानवसेवेचा व्रत जपणारे, माणसात देव शोधणारा संत कर्मयोगी गाडगे महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपले जीवन आचरण करावे असे शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय आमगाव ( म) येथे घेण्यात आलेल्या गाडगे महाराज स्मृतिदिना प्रसंगी प्रभारी प्राचार्य प्रकाश निमकर यांनी प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रकाश निमकर ,मार्गदर्शक सुरेश केळझरकर, नरेंद्र चिटमलवार, सुवेंदु मंडल पुरुषोत्तम गुरुनुले , अभिषेक ढोंगे, अनिल निमजे, गजानन बारसागडे चंदू सातपुते, रोशन वासेकर, लीलाधर दुधबळे, रतन शिकदर, सुरज मुन गेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आले .त्यानंतर मानवता जोपासणारे गीत सादर करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे प्रास्ताविक व मार्गदर्शन सुरेश केळझरकर आभार अभिषेक ढोंगे यांनी मानले.