सावरगाव येथे आदिवासी गोवारी जमात प्रबोधन मेळावा व 114 शहीद बांधवांना श्रद्धांजली

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

मेळाव्याला हजारोच्या संख्येत गोवारी बांधव

सावरगाव,दि.२६/१२/२०२२

मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.18 डिसेंबर 2020 ला आदीवासी गोवारी जमातीला निर्णय देतांना ज्या संविधानिक तरतुदीचा आधार घेतलेला आहे.त्याच संविधानिक व निर्णयाचा लाभ हा गोवारी जमातीला कसा फायदेशीर आहे या करिता आदिवासी गोंड गोवारी युवा संघर्ष कृती समितीच्या विद्यमानाने नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवाना श्रद्धांजली व आदिवासी जमात प्रबोधन मेळावा रविवारी पार पडला.

सर्व प्रथम शहीद स्मारकाला श्रद्धांजली अर्पण करून महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन कोहरे जिल्हाध्यक्ष संस्कृती कल्याण मंडळ चंद्रपूर, तर उदघाटक म्हूणन अध्यक्ष आ.गो. नागपूर कैलास राऊत, सचिव सेवा मंडळ भंडारा हेमराज नेवारे, रुपेश चामलाटे, सचिव आ.गो.गो. कल्याण मंडळ चंद्रपूर पत्रुजी नागोसे, डॉ.पूर्णानंद नेवारे, जि. प. सदस्या जि.भंडारा माहेश्वरी नेवारे, सरपंच रवींद्र निकुरे, जिल्हाध्य्क्ष विनायक वाघाडे, केशव सोनवाणे, भास्कर राऊत वर्धा, विलास राऊत, उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, ग्रा.प. सदस्य शिवशंकर सहारे, कविता राऊत, विमल राऊत, आशा गेडाम, त.मु. स. अध्यक्ष सचिन निकुरे, बाबुराव येसनसुरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रुपेश चामलाटे यांनी साविंधनिक आरक्षण गोंड गोवारी मुळात कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय कसा लाभदायक आहे यावर विवेचन व्यक्त केले. दरम्यान पूर्णानंद नेवारे यांनी गोवारी जमातीची संस्कृतीमध्ये ढाल, वाघोबा, वाघोबा यावर मार्गदर्शन केले तर जि. प. सदस्या जि भंडारा माहेश्वरी नेवारे यांनी गोडं गोवारी जमातीचा दावा टाकावे व गोंड गोवारी प्रमाणपत्र यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी जात प्रमाणपत्र व गोंड गोवारी जमातीवर निवडणूक कशी लढवायची याबाबत प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन कोहळे यांनी मुलांच्या शिष्यवृत्ती व जमातीवर येणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन केले.दरम्यान जमातीतील विध्यार्थी, समाजसेवक, गायकी, सरपंच, याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सुभाष गजभे, प्रदीप येसनसुरे तर प्रस्ताविक विनायक नेवारे आभार प्रमोद राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अंबादास कोहळे, युवराज आंबडहारे, गुरूदास नेवारे, किशोर नेवारे, देवेंद्र चामलाटे, वंदना चचाने, मोरेश्वर शेंद्रे , लोकनाथ राऊत , बंडु ठाकरे, ज्योती कोहरे, सुखदेव नेवारे, गणेश अरतपहारे, अरुण नेवारे, अनिल नेवारे, राहुल अरदपहारे, मंगेश ठाकरे, संजय राऊत, देवा भंडारे, भारती नेवारे, वर्षा सोनवाणे, युवा संघर्ष कृतीचे सदस्य व सावरगाव येथील जेष्ठ मंडळी व महिला आघाडी आदीनि परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संपूर्ण आदिवासी गोवारी जमात बांधव हजारोच्या संख्येत उपस्थित होते.