श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
वडसा दि. ०२/०१/२०२३
अमानविय विकृतीचा कळस गाठणार्या पेशवाई च्या विरोधात महार बटालियन च्या ५०० अमर विरांनी प्रतिबंधाचे जोखड तोडुन १ जानेवारी १८१८ ला २८ हजार पेशवा सैनिकांना पराभुत करुन इतिहास घडविला त्या अमर विरांच्या शौर्यगाथेला अभिवादन करण्यासाठी बौद्ध समाज कोअर कमेटी देसाईगंज च्या वतिने शौर्यदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडीया चे नागपुर प्रांतप्रमुख विजय बंसोड बौद्समाज कोअर कमेटीचे सल्लागार अशोक बोदेले डाकराम वाघमारे अड् बाळकृष्ण बांबोळकर इंजि नरेश मेश्राम समिती अध्यक्ष प्रकाश सांगोळे हंसराज लांडगे भिमराव नगराळे साजन मेश्राम सुरज ठवरे आशिष दा घुटके अंकुश गोंडाणे यांचेसह समता सैनिक दलाचे शिपाई व बौद्ध समाज कोअर कमेटीचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विर पराक्रमी संभाजी राजे यांच्या क्रृर अमानविय हत्तेचा धिक्कार करत महार जातिच्या लोकांनी संभाजी राजेंच्या मृत शरिराचे तुकडे एकञ करुन त्यांचा अंत्यसंस्कार केला या घटनेच्या विरोधात सनातन्यांनी महार समाजावर पुर्ण:ता बहिष्कार करुन या समाजाला अमानविय पद्धतिने वागनुक देणे सुरु केले तोंडाला गाडगे व कमरेला झाडु ही परंपरा पेशवाई नी महारांसाठी सुरु केली महार ही जात शुर व पराक्रमी असल्याने महार जातिला इंग्रजांनी सैन्यात भरती करणे सुरु केले इंग्रजासोबत राहुन पेशव्यांचे विरोधात लढणे महार बटालियन ला अयोग्य वाटत होते तेव्हा रायनाक महार सैनिकाने पेशव्यांना आमच्या विरोधात अमानविय संस्कृती बंद करावी अशी विनंती केली असता कुळकर्णी याने साफ इंकार करत एक कणाचा ही बदल करणार नाही अशी भुमिका घेतल्याने महार सैन्य खळवळले व १जानेवारी १८१८भीमा नदिच्या काठानजिक असलेल्या कोरेगाव येथे झालेल्या घणघोर युद्धात २८ हजार पेशवा सैनिकांचा धुव्वा उडवुन कलंकित जिवन जगण्याचे जोखड तोडुन शौर्याचा इतिहास रचला या युद्धात २१ महार सैनिक ही मारल्या गेले त्यांच्या अमरगाथेला अभिवादन करण्यासाठी भीमाकोरेगाव येथे विजय स्तंभ बांधण्यात आले दरवर्षी या अमरविरांना अभिवादन करण्याची परंपरा सदोदित जिवंत रहावी या साठी बौद्ध समाज कोअर कमेटी देसाईगंज च्या वतिने शौर्य दिनाचे आयोजन केले मलिंद बौद्धविहार येथुन रैलिचे नियोजन करुन दिक्षाभुमी देसाईगंज येथे भिमाकोरेगांव अमरविरांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी विजय बंसोड अशोक बोदेले यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन हंसराज लांडगे तर आभार प्रदर्शन डाकराम वाघमारे यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य बांधव भगिनी उपस्थित होते ।।